|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मुख्यमंत्री पर्रीकरांची प्रकृती स्थीर

मुख्यमंत्री पर्रीकरांची प्रकृती स्थीर 

प्रतिनिधी/ पणजी

मुंबईतील लीलावती इस्पितळात उपचारासाठी दाखल केलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थीर आहे. कदाचित मुख्यमंत्री पर्रीकर आज शनिवारी किंवा रविवारी गोव्यात दाखल होतील. गुरुवारी त्यांना उपचारासाठी लीलावती इस्पितळात दाखल केले होते.

गुरुवारी संध्याकाळी त्यांना अचानकपणे उलटय़ा होऊ लागल्याने तातडीने मुंबईला नेण्यात आले होते. लीलावतीमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु केल्यानंतर त्यांची प्रकृती काल स्थीर झाली. अमेरिकेतून 22 रोजी ते गोव्यात दाखल झाले होते. काल 24 रोजी ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिविसर्जन कार्यक्रमात सहभागी होणार होते. मात्र तब्येत बिघडल्याने त्यांना इस्पितळामध्ये दाखल व्हावे लागले.