|Sunday, November 18, 2018
You are here: Home » Top News » कोकण म्हाडाची लॉटरी सोडत आज

कोकण म्हाडाची लॉटरी सोडत आज 

ऑनलाईन टीम / मुंबई :

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीची आज, शनिवारी सोडत काढण्यात येणार आहे. वांदे येथील म्हाडाच्या मुख्यालयात सकाळी 10 वाजता 9,018 घरांसाठी सोडत निघेल. तब्बल 55 हजार लोक लॉटरीच्या माध्यमातून आपले नशीब आजमावणार आहेत.

म्हाडाने जुलै महिन्यात कोकण म्हाडाच्या बोर्डाच्या 9,018 घरांच्या लॉटरीची घोषणा केली होती.18 ऑगस्ट रोजी अर्ज करण्याची मुदत संपली. या प्रक्रियेत 55 हजार जणांनी अनामत रक्कम भरली. एकूण 9,018 घरांपैकी 4,000 पेक्षा जास्त घरे ठाणे व विरारमधील आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांचा पहिल्यांदाच या लॉटरीत समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत 3,937 घरे आहेत. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल गटासाठी 4,455, अल्प उत्पन्न गटासाठी 4,341, मध्यम उत्पन्न गटासाठी 215, तर उच्च उत्पन्न गटासाठी सात घरे आहेत. लॉटरीतील घरे प्रामुख्याने मीरा रोड, विरार, ठाणे, शिरढोण, खोणी या भागातील आहेत.

 

Related posts: