|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » खड्डे दाखल्याबद्दल आदित्य ठाकरेंना हजार रूपये पाठवा ; धनंजय मुंडे

खड्डे दाखल्याबद्दल आदित्य ठाकरेंना हजार रूपये पाठवा ; धनंजय मुंडे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

खड्डा दाखवा बक्षीस मिळवा योजनेतील हजार रूपये आता मित्रपक्ष शिवसेना आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठवा, असा टोला विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सार्वजनिक बांधाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

नाशिक दौऱयावर जात असताना खड्डय़ांबद्दल आदित्य ठाकरेंना हजार रूपये पाठवा. आदित्य ठाकरे यांना खड्डय़ांचा फटका बसला.रस्त्यावरील जीवघेण्या खड्डयांमुळे त्यांच्या अलिशान रेंजरोव्हर गाडीचे टायर फुटले.आदित्य ठाकरे यांच्या गाडीचे टायर फुटल्याने विरोधी पक्षांनी सत्ताधाऱयांवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. धनंजय मुंडे यांनी ट्वटि करून चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला आहे. ’पाहा राज्यातील रस्त्यांची अवस्था कशी झाली आहे. खड्डा दाखवा अन् बक्षीस मिळवा योजनेतील हजार रुपये आता मित्रपक्ष शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना पाठवा’ असं म्हणत चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.