|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » विविधा » नारळी पौर्णिमेनिमित्त १००१ नारळांनी सजले दत्तमंदिर

नारळी पौर्णिमेनिमित्त १००१ नारळांनी सजले दत्तमंदिर 

 ऑनलाईन टीम/ पुणे :
नारळी पौर्णिमेनिमित्त बुधवार पेठेतील कै.लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात तब्बल १००१ शहाळ्यांच्या नारळांची आकर्षक आरास करण्यात आली आहे.
नारळाचे झाड हे कल्पवृक्ष म्हणून ओळखले जाते. त्यामुळे मंदिरात तीन दिवसीय कल्पवृक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या कळसापर्यंत नारळाची झाडे, मुख्य गाभा-यासह प्रवेशद्वारावर आकर्षक फुले व पानांची आरास यामुळे दत्तमहाराजांना एक हजार नारळांचा नैवेद्यच दाखविण्यात आला आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष मोहिते, कार्यकारी विश्वस्त बी.एम.गायकवाड, खजिनदार अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, उत्सवप्रमुख चंद्रशेखर हलवाई, उपउत्सवप्रमुख उल्हास कदम,  विश्वस्त अंकुश काकडे, अ‍ॅड.एन.डी.पाटील, युवराज गाडवे, नंदकुमार सुतार यांसह कर्मचारी आणि भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. ट्रस्टचे यंदा १२१ वे वर्ष आहे. शनिवारी सकाळपासून भाविकांनी ही आरास पाहण्यासाठी मोठया प्रमाणात गर्दी केली.