|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Top News » भाजप खासदाराच्या कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

भाजप खासदाराच्या कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील खासदार प्रवक्ते जी व्ही एल नरसिंह राव यांच्या कारने दोन पादचाऱयांना धडक दिली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून आणखी एक महिला जखमी झाली आहे. आंध्र प्रदेशमध्ये ही घटना घडली असून अपघातानंतर जमाव संतप्त झाला होता. जमावाचा पवित्रा पाहता खासदारांनी तिथून काढता पाय घेतला. अपघातानंतर खासदार तिथून निघून गेल्याने सोशल मीडियावर राव यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

 

शुक्रवारी खासदार जी व्ही एल नरसिंह राव हे प्रकाशम जिह्यातून विजयवाडा येथे जात होते. राष्ट्रीय महामार्गावर कोलनूकोंडा येथे दोन महिला रस्ता ओलांडत होत्या. या महिलांना राव यांच्या कारने धडक दिली. यानंतर कार दुभाजकावर जाऊन आदळली आणि तिथेच थांबली. ही धडक इतकी भीषण होती की एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एक महिला जखमी झाली. अपघाताचे वृत्त समजताच दोन्ही महिलांचे नातेवाईक व ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. जमावाच्या संतप्त भावना पाहता राव यांनी घटनास्थळावरुन काढता पाय घेतला. दुसऱया कारमधून ते मार्गस्थ झाले. तर पोलिसांनी त्यांच्या चालकाला अटक केली आहे.

 

 

Related posts: