|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » थोरातच्या घरी सापडल्या 34 फाईल्स

थोरातच्या घरी सापडल्या 34 फाईल्स 

रत्नागिरी नगर परिषद बांधकाम विभागाचे प्रकरण, हजारोची लाच मागितल्याचा आरोप,

दोन दिवसाची पोलीस कोठडी

प्रतिनिधी /रत्नागिरी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेल्या आनंदा थोरात यांच्याकडे बांधकाम परवानगीच्या 34 फाईल्स असल्याचे पोलिसांनी त्यांच्या घरी टाकलेल्या छाप्यात स्पष्ट झाल़े यामुळे गैरव्यवहार केवळ एका प्रकरणापुरता नसल्याचा संशय यामुळे बळावला आह़े दरम्यान न्यायालयाने थोरात यांना 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल़ा

रत्नागिरी नगर परिषदेत काम करणाऱया आनंद थोरात यांना 5 हजार रूपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी मारूती मंदिर रत्नागिरी येथील एका हॉटेलच्या बाहेरच्या बाजूला पकडले होत़े त्यानंतर त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आल़े तेव्हा न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावल़ी

लाचलुचपत प्रतिबंध विभागाने थोरात यांच्या मालमत्ता तपासण्याचा निर्णय घेतल़ा घरी छापा टाकला तेव्हा रत्नागिरी नगर परिषदेच्या 34 फाईल थोरात यांच्या घरी सापडल्य़ा त्या फाईल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जप्त केल्य़ा केवळ एका प्रकरणाचा हा मुद्दा नसून अनेक प्रकरणात गैर व्यवहाराचा संशय जप्ती प्रकरणामुळे बळावला आह़े

तर हा प्रकार टळला असता – बंडय़ा साळवी

रत्नागिरी नगर परिषदेतील बांधकाम विभागातील कर्मचारी आनंद थोरात याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल़े या कर्मचाऱयाची नियुक्ती मेस्त्राr पदासाठी असून त्याला त्याच कामासाठी पाठवावे, अशी आग्रही मागणी यापूर्वी आपण केली हात़ी त्याकडे दुर्लक्ष झाल्याने हा प्रकार घडला असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे नगर परिषदेतील गटनेते बंडय़ा साळवी यांनी दिल़ी

ते म्हणाले रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदी महेंद्र मयेकर असताना आपण ही सूचना केली होत़ी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल़े यानंतर सत्ता पालट झाल़ा राहुल पंडित हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आल़े त्यांच्याकडून थोरात यांना मेस्त्राrपदी काम करण्यास पाठवणे नजर चुकीने राहुन गेल़े

आनंदा थोरात यांची नियुक्ती बांधकाम विभागात मेस्त्राr पदावर झाली आह़े त्यांना त्या पदावर कामाला पाठवण्sा आवश्यक होत़े ते झाले नाह़ी म्हणून थोरात यांना संधी उपलब्ध झाल़ी त्यातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचा मुद्दा निर्माण झाला, असे बंडय़ा साळवी म्हणाल़े