|Sunday, April 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » वाजपेयींना ‘चतुरंग’चा अभिमानमूर्ती मरणोत्तर पुरस्कार

वाजपेयींना ‘चतुरंग’चा अभिमानमूर्ती मरणोत्तर पुरस्कार 

पुणे येथे होणार राष्ट्रीय नेते,

मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण

चिपळूण / प्रतिनिधी

देशासाठी अभिमानास्पद अशी उत्तुंग कामगिरी करणाऱया व्यक्तिमत्वाला चतुरंग प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा अभिमान मूर्ती हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार यावर्षी मरणोत्तर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना घोषित करण्यात आला आहे. तशी घोषणा प्रतिष्ठानचे विद्याधर निमकर यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

ते पुढे म्हणाले की, चतुरंग प्रतिष्ठान या सांस्कृतिक-सामाजिक संस्थेतर्फे ध्येय निवडून एखाद्या कार्यक्षेत्रासाठी निरपेक्ष वृत्तीने स्वतःच्या आयुष्याचे योगदान देऊन देशासाठी भरीव, उत्तुंग आणि सर्वोत्तम अशी कामगिरी करणाऱया निरपवाद अशा व्यक्तीला पर्सन ऑफ प्राईड अर्थात अभिमान मूर्ती हा पुरस्कार दिला जातो. गेल्याच आठवडय़ात निधनानंतर सर्वप्रकाराच्या प्रसिध्दी माध्यमांद्वारे जगासमोर आलेली राष्ट्रहितैषी, मानवतावादी, लोकशाही तत्वप्रणालीयुक्त आणि देशाच्या संस्कृती संचितात लक्षणिय भर घालणारी आयुष्यभराची अमौलिक कामगिरी लक्षात घेऊन यावर्षी जगन्मान्य नेते वाजपेयी यांना हा सर्वोच्च पुरस्कार प्रथमच मरणोत्तर प्रदान करण्याचा निर्णय प्रतिष्ठानने एकमताने घेतला आहे.

जमिनीवर पाय ठेऊन आकाशात झेप घेऊ पहाणारी मानवाकृती अशा रूपातले सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून यापूर्वी हा पुरस्कार ए. पी. जे अब्दुल कलाम, डॉ. के. कस्तुरीरंगन, टी. एन. शेषन, ई. श्रीधरन्, नारायण मूर्ती, डॉ. रघुनाथ माशेलकर, कमांडर दिलीप दोंदे यांना प्रदान करण्यात आला आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात वाजपेयी यांची मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांना निमंत्रित करून राष्ट्रीय नेते व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पुणे येथे आयोजित केला जाणार असल्याचे निमकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related posts: