|Sunday, November 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » दापोली-पुणे शिवशाहीला अपघात, 13 प्रवासी जखमी

दापोली-पुणे शिवशाहीला अपघात, 13 प्रवासी जखमी 

चालक फरार

 

प्रतिनिधी /दापोली

येथील बस स्थानकातून सकाळी पावणेआठ वाजता सुटणाऱया दापोली-पुणे या शिवशाही गाडीला माणगावनजीक अपघात झाला. यात 13 प्रवासी जखमी झाले आहेत.

समोरच्या गाडीला ओव्हरटेक करताना समोरून अचानक दुसरी गाडी आल्याने चालकाने गाडी उजव्या बाजूला वळवली. यात ती गाडी शेतात उलटून हा अपघात झाला. यात वाहक गणसिंग पाटील यांच्यासह अल्लाउद्दीन शेख, रविकांत बुटाला, राजश्री राक्षे, रूपाली राक्षे, मधुकर कदम, ममता कांबळे, सचिन मेहता, दीपाली मेहता, संगीता कुलकर्णी, शशिकांत कुलकर्णी, विनोद महाडीक, जयवंत जोगळेकर, सिध्देश लिंगावळे आदी जखमी झाले आहेत. या सर्वांना माणगाव कुटीर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर गाडीचा चालक फरार झाला असल्याची माहिती माणगाव आगाराचे वाडवळ यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना दिली.

Related posts: