|Tuesday, September 25, 2018
You are here: Home » मनोरंजन » इंटरनेट मायाजालाची गोष्ट टेक केअर गुड नाईट

इंटरनेट मायाजालाची गोष्ट टेक केअर गुड नाईट 

‘वाय झेड’, ‘फास्टर फेणे’, ‘फोटोकॉपी’ या चित्रपटामुळे पर्ण पेठे हे नाव मराठी इंडस्ट्रीत लोकप्रिय झाले आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेला नवीन मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’ संपूर्ण महाराष्ट्रात 31 ऑगस्ट 2018 रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटात पर्ण पेठे ही महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. गिरीश जयंत जोशी यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे आणि आदिनाथ कोठारे यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाची निर्मिती हिमांशू केसरी पाटील आणि महेश मांजरेकर यांनी केली असून नरेंद्र भिडे यांचे त्याला संगीत आहे.

  ही एक सर्वसामान्य कुटुंबाची कथा असली तरी सायबर क्राईमसारख्या गंभीर विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये सायबर सुरक्षिततेविषयी जनजागफती करण्याचे काम करेल, असे पर्ण पेठे म्हणाली. ‘टेक केअर गुड नाईट’ हे एका कुटुंबाची गोष्ट आहे. आईबाबा आणि दोन मुले असे हे एक गोड कुटुंब आहे. शाळेमध्ये काही मुले खूप हुशार असतात तर काही मुले खूप दंगेखोर असतात. अशाच मुलांकडे सगळय़ांचे लक्ष असते. पण, अशी काही मुले पण असतात ती खूप हुशार नसतात व ती दंगे पण करत नाहीत अशा मुलांचे ही मुलगी प्रतिनिधित्व करत असते. तिला जास्त लोकांमध्ये मिसळायला आवडत नाही. म्हणूनच ती मोबाईल किंवा इंटरनेट यांचा आधार घेत असते. एक दिवस चॅटींग करताना अचानक काय कॉम्पलीटीसी तयार होते. मग तो प्रॉब्लेम सोडवताना कुटुंबाला काय अडचणी येतात याची ही गोष्ट आहे. पहिल्यापासूनच मी इरावती हर्षे यांची चाहती होते. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करायला मिळणे मी भाग्यच समजते. सचिन खेडेकर, महेश मांजरेकर हे देखील दिग्गज कलाकार आहेत. सेटवर त्यांच्याकडून तसेच आदिनाथ कोठारे आणि लेखक आणि दिग्दर्शक गिरीश जयंत जोशी यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या. सायबर क्राईम या विषयाभोवती आपल्याकडे फारच कमी चित्रपट आले आहेत. ऑनलाईन व्यवहार करताना आपण अनेकदा आपले पासवर्ड आणि बँकेचे खाते क्रमांक सेव्ह करतो. त्यामुळे आपले पैसे जाऊ शकतात किंवा आपल्या पर्सनल गोष्टी लीक होऊ शकतात. त्याविषयी आपण सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे, असे पर्ण पेठे म्हणाली.

Related posts: