|Monday, April 22, 2019
You are here: Home » मनोरंजन » रसिका-आदितीचा दोस्ताना

रसिका-आदितीचा दोस्ताना 

आपल्या हटके अंदाजात कटकारस्थानं करत धमाल उडवून देणाऱया ‘माझ्या नवऱयाची बायको’ मालिकेतील शनाया आणि ईशा यांचा दोस्ताना सर्वश्रुत आहेच. आपला दोस्ताना कायम ठेवत पुन्हा एकदा बदमाशियां करण्यासाठी या दोघी सज्ज झाल्या आहेत. फक्त आता त्यांचा हा दोस्ताना येऊ घातलेल्या ‘यू अँड मी’ या नव्या व्हिडीओ अल्बमसाठी आहे.

  जरासा कट्टा टाकू आता… जरासी बाते तेढीमेढी… थोडासा किस्सा करू आता…  थोडीशी यादे तेरी मेरी… करू आम्ही मनमानिया… ऐसी है अपनी यारीया… असं म्हणत रसिका सुनील आणि आदिती द्रविड, आपला गहिरा दोस्ताना या अल्बमच्या माध्यमातून दाखवणार आहेत. या दोघींचा ‘यू अँड मी’ हा नवाकोरा अल्बम लवकरच प्रेक्षक भेटीस येत असून व्हिडीओ पॅलेसने या अल्बमची निर्मिती केली आहे. या गाण्याची खासियत म्हणजे स्वत: आदिती द्रविड हिने हे गाणं लिहिलं असून आदिती आणि रसिकानेच हे गाणं गायलं आहे. या अल्बमच्या निमित्ताने रसिकाच्या गायकीची नवी ओळख प्रेक्षकांना होणार आहे. साई-पियुष यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं असून फुलवा खामकर हिने या गाण्याचं नफत्यदिग्दर्शन केलं आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे. लोणावळा येथे चित्रीत झालेल्या या एका गाण्यासाठी रसिका आणि आदिती यांनी 12 वेगवेगळे ड्रेस परिधान केले आहेत. अभिनयातल्या रंगानंतर रसिका आणि आदितीच्या संगीताचे सूर ही प्रेक्षक पसंतीस उतरतील अशी आशा आहे.

Related posts: