|Thursday, September 20, 2018
You are here: Home » मनोरंजन » आदर्श शिंदेची आगळीवेगळी स्टाईल

आदर्श शिंदेची आगळीवेगळी स्टाईल 

संगीत सम्राट पर्व दुसरे मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील होतकरू गायक आणि संगीतकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ संगीत सम्राट पर्व 2 ने उपलब्ध करून दिले आहे. पहिल्या पर्वाप्रमाणेच दुसऱया पर्वालादेखील प्रेक्षकांचे प्रेम आणि उदंड प्रतिसाद लाभत आहे. प्रेक्षक जरी दुसऱया पर्वाच्या रुपरेषेत काही बदल अनुभवत असले तरी परीक्षक म्हणून आदर्श शिंदे यांची जागा दुसऱया पर्वात देखील कायम आहे.

पहिल्या पर्वापासून आदर्श शिंदे एक उत्तम परीक्षक बनून स्पर्धकांना योग्यरीत्या मार्गदर्शन करत आले आहेत. त्यांचा महत्वपूर्ण प्रतिसाद आणि त्यांच्या अनुभवातून स्पर्धक खूप काही शिकू शकतात. आदर्श शिंदे यांची परीक्षणाची ही हटके स्टाईल प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे. आदर्शच्या परीक्षणाच्या स्टाईलसोबतच त्याचा पॅशन सेन्स देखील सर्वांना आवडतो आहे. आदर्श दुसऱया पर्वात त्याच्या स्टाईल सोबत एक्सपेरिमेंट करताना दिसत आहे. सर्व पॅशन ट्रेंडस् बाजूला करून आदर्श स्वत:ची अशी वेगळी स्टाईल निर्माण करत आहे. या पर्वात आदर्श ब्राईट कलरचे आऊटफिट आणि त्यासोबत कॉम्प्लिमेंट करेल असे बूट परिधान करतो तसेच त्याचे ट्रेंडी आऊटफिट तितक्याच आत्मविश्वासाने पॅरी देखील करतो.

 त्याच्या स्टाईल सेन्सबद्दल बोलताना आदर्श म्हणाला, माझ्या मते पॅशनची अशी काही निश्चित परिभाषा नाही. मी माझ्या मूड आणि कम्फर्टप्रमाणे ड्रेसअप होतो. माझ्या कॉश्यूम डिझायनरला माझी स्टाईल खूप चांगल्यारित्या समजली आहे. मला बोल्ड आणि ब्राईट ड्रेसिंग स्टाईल आवडते. अनोखे पॅटर्न्स, सुंदर रंग आणि ट्रेंडी स्टाईल हे सगळे कॉम्बिनेशन म्हणजे माझा पॅशन मंत्र आहे.

Related posts: