|Monday, July 22, 2019
You are here: Home » मनोरंजन » मधुकर तोरडमलांचा वारसा जपणार तृप्ती तृप्ती

मधुकर तोरडमलांचा वारसा जपणार तृप्ती तृप्ती 

मुलांनीही आपला वारसा चालवावा असं सामान्यातल्या सामान्य व्यक्तीलाही वाटत असतं. आपल्या आई-वडिलांचा वारसा चालवत जेव्हा मुलं त्यांचं नाव मोठं करतात, तेव्हा आई-वडिलांनाही त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. दिवंगत अभिनेते मधुकर तोरडमल हे मराठी नाटय़-सिनेसफष्टीतील खूप मोठं नाव. त्यांची मुलगी तफप्ती तोरडमल आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनेत्री बनली आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाद्वारे तफप्ती अभिनेत्री म्हणून मोठय़ा पडद्यावर पदार्पण करत आहे.

जे. ए. एन्टरटेन्मेंट आणि पॅनोरमा स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाची निर्मिती जॉन अब्राहम करत आहे. स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाद्वारे जॉनची पावलं मराठीकडे वळण्यासाठीही तफप्तीच कारणीभूत आहे. तफप्तीला मराठी चित्रपटाची निर्मिती करायची होती. स्वप्ना वाघमारे यांची जशी ती मैत्रीण आहे, तशीच जॉनचीही आहे. जॉनसोबत तफप्तीचे घरगुती ऋणानुबंध आहेत. जॉनला मराठी चित्रपट करायचा होताच. जेव्हा ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकाबद्दल आणि त्यावर आधारित असलेल्या चित्रपटाबद्दल सांगितलं, तेव्हा तो स्वत:हून या चित्रपटाच्या निर्मितीत सहभागी व्हायला तयार झाल्याचं तफप्तीचं म्हणणं आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकाचा चित्रपट बनवण्याविषयी बोलताना तफप्ती म्हणाली की, अभिनयक्षेत्रात वडिलांचं खूप मोठं नाव आहे. पण, मी अभिनेत्री बनायचं असं कधीच ठरवलं नव्हतं. प्रोडक्शन करण्याची माझी इच्छा होती. त्या निमित्ताने मी आणि स्वप्नाताई शिरीष लाटकर यांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे निघालो होतो. त्यावेळी स्वप्नाताईंनी गाडीमध्ये या नाटकावर चित्रपट बनवायचा विचार असल्याचं सांगितलं. ते मला खूप भावलं आणि गाडीतून उतरण्यापूर्वीच आमचा विचार बदलला. शेखर ताम्हाणे यांच्याशी फोनवर बोलून नाटकाच्या हक्काबाबतही चर्चाही झाली. अशाप्रकारे अचानकपणे ‘सविता दामोदर परांजपे’चा नाटक ते चित्रपट असा प्रवास सुरू झाला.

 खरं तर ‘सविता दामोदर परांजपे’ हा तफप्तीचा अभिनयातील पदार्पणाचा चित्रपट आहे. पण, ती या चित्रपटाबाबत खूप कॉन्फीडन्ट आहे. ती म्हणते की, पप्पांचा आशीर्वाद माझ्या मागे आहे. त्यामुळेच हे घडून आलं आहे. कदाचित मी अभिनय करावं असं त्यांना वाटत होतं. पण, त्यांनी कधीच कोणतीही गोष्ट माझ्यावर लादली नाही. त्यांच्या प्रेरणेमुळेच मी अभिनेत्री बनले आहे.

 शेखर ताम्हाणे यांच्या दिग्दर्शनाखाली 1985 मध्ये मराठी रंगभूमीवर अवतरलेल्या ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकाने त्या काळातील प्रेक्षकांचा थरकाप उडवला होता. नाटकामध्ये राजन ताम्हाणे आणि रीमा लागू यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाचं लेखन शिरीष लाटकर यांनी केलं आहे. नाटकात रीमा लागूंनी साकारलेली भूमिका तफप्तीने साकारली आहे. तफप्तीच्या जोडीला सुबोध भावे आणि राकेश बापट, पल्लवी पाटील, अंगद म्हसकर, आणि सविता प्रभुणे या कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. येत्या 31 ऑगस्टला ‘सविता दामोदर परांजपे’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.