|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आडेली येथील वीज उपकेंद्राचे उद्घाटन

आडेली येथील वीज उपकेंद्राचे उद्घाटन 

सात गावांना होणार फायदा : ग्रामस्थांमध्ये समाधान

वार्ताहर / वेंगुर्ले:

आडेली येथे 33/11 केव्हीच्या वीज उपकेंद्राचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते झाले. या वीज उपकेंद्राचा फायदा आडेली, वजराठ, वेतोरे, खानोली, नेमळे, कामळेवीर, मठ या गावांना होणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

आडेली जि. प. मतदारसंघातील जनतेला सतत भेडसावणाऱया वीज पुरवठय़ाच्या समस्या सोडविण्याठी आडेली येथे वीज उपकेंद्र उभारण्याची मागणी खासदार राऊत यांच्याकडे करण्यात आली होती. राऊत यांच्या प्रयत्नातून आडेली उपकेंद्राचे काम मार्गी लागले आहे. या 33/11 केव्ही 0.5 एम.बी.ए. क्षमतेचा आराखडा-2 या योजनेंतर्गत सदर उपकरण उभारणीचे काम महावितरण कंपनीमार्फत भारत विकास ग्रुप या कंपनीतर्फे करण्यात आले आहे. या उपकेंद्राचा 146.12 लाख इतका प्रकल्पाचा खर्च आहे. उपकेंद्रासाठी 132/33 केव्ही कुडाळ या उपकेंद्रातून 33 केव्ही तारमार्ग कुडाळ ते वेंगुर्ल या जुन्या वाहिनीला टॅपिंग केलेले असून त्याची लांबी 0.682 कि. मी., तर उपतारमार्ग व भूमिगत तार मार्गाची लांबी 2.533 कि. मी. इतकी आहे. त्याचा प्रकल्प खर्च 72 लाख इतका आहे. या उपकेंद्रातून आडेली, वेतोरा, मठ असे 11 केव्हीचे 3 फिडर उभारण्यात आले आहे. वेंगुर्ले उपविभागांतर्गत यापूर्वी कमी दाबाने वीज पुरवठा होत असलेल्या आडेली, वजराट, वेतोरे, खानोली, नेमळे, कामळेवीर, मठ या गावांना योग्य दाबाने वीजपुरवठा केला जाणार आहे.

उद्घाटनप्रसंगी तालुकाप्रमुख बाळा दळवी, सभापती यशवंत परब, माजी सभापती आबा कोंडसकर, युवासेना प्रमुख पंकज शिरसाट, शहरप्रमुख विवेकानंद आरोलकर, महिला तालुका आघाडीप्रमुख सुकन्या नरसुले, शहर आघाडीप्रमुख मंजूषा आरोलकर, युवासेना शहरप्रमुख शेखर काणेकर, उमेश नाईक, सरपंच राधिका गावडे, उपतालुकाप्रमुख उमेश नाईक, प्रकाश उर्फ बाळा गावडे, दाभोली सरपंच उदय गोवेकर, उपसरपंच आनंद दाभोलकर, शाखाप्रमुख नाना वालावलकर, उपसरपंच श्याम नाईक, नगरसेवक संदेश निकम आदी उपस्थित होते.