|Friday, November 16, 2018
You are here: Home » Automobiles » टाटा मोटर्सने भारतीय सैन्यदलासाठी डिझाईन केली ‘सफारी स्टॉर्म’

टाटा मोटर्सने भारतीय सैन्यदलासाठी डिझाईन केली ‘सफारी स्टॉर्म’ 

ऑनलाइन टीम/ पुणे :

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये टाटा मोटर्सच्या 1500 व्या जीएस 800 (जनरल सर्व्हिस 800) ‘सफारी स्टॉम’& या नव्या गाडीचा समावेश झाला आहे. पुण्यातील टाटा मोटर्सच्या प्रकल्यात केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाचे एमओएस डॉ. सुभाष भामरे आणि टाटा मोटर्सच्या सरकारी व्यापार व संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष वर्मन नोरोन्हा यांच्या उपस्थितीत ही गाडी लष्कराला स्वाधीन करण्यात आली. भारतीय सैन्यदलाच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून ही गाडी तयार करण्यात आली आहे.

‘टाटा जीएस 800 सफारी स्टॉर्म’ असे या गाडीचे नाव असुन यामध्ये फॉग लॅम्स, रिकव्हरी हूक्स, जेरी कॅन आणि एबीएस ही वैशिष्टय़े आहेत. सैन्याच्या युध्दादरम्यानच्या सर्व गरजा यातून पूर्ण होऊ शकतात. सैन्यदलाने एकुण 3192 गाडय़ांची मागणी करण्यात आली असुन त्यापैकी 1300 गाडय़ांची डिलिव्हरी आत्तापर्यंत करण्यात आली आहे.

 

Related posts: