|Tuesday, December 11, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मासेमारीहून परत आलेल्या सर्जेकोटच्या मच्छीमाराचा मृत्यू

मासेमारीहून परत आलेल्या सर्जेकोटच्या मच्छीमाराचा मृत्यू 

वार्ताहर / मालवण:

  मासेमारीहून परत आलेल्या शिरीष काशिनाथ पेडणेकर (48 रा. सर्जेकोट पिरावाडी) या मच्छीमाराचा शहरातील खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबतची खबर प्रकाश मोरजे यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली असून आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

 सर्जेकोट येथील विकास परुळेकर यांच्या नौकेवरून प्रकाश मोरजे, शिरीष पेडणेकर हे तिघेही सोमवारी पहाटे सर्जेकोट येथील समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. ते मासेमारी करून परतले असताना शिरीष पेडणेकर यांना अस्वस्थ वाटू लागले त्यामुळे त्यांना तात्काळ शहरातील खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबतचा अधिक तपास सुनील पवार करत आहेत.

Related posts: