|Sunday, November 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वादळसदृश स्थितीमुळे शेकडो नौका देवगड बंदरात

वादळसदृश स्थितीमुळे शेकडो नौका देवगड बंदरात 

वार्ताहर / देवगड:

समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाल्यामुळे खोल समुद्रात मासेमारी करणाऱया परराज्यातील सुमारे शंभरहून अधिक नौका सोमवारी दुपारपासूनच देवगड बंदराच्या आश्रयास आल्या आहेत. यामध्ये गुजरात व कर्नाटकमधील नौकांचा समावेश आहे. त्यामुळे देवगड बंदर गजबजले आहे. तालुक्यामध्ये वादळी वाऱयांसह पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. ताशी 35 कि. मी. वेगाने वारे वाहत असून समुद्रही खवळला आहे. वादळसदृश स्थितीमुळे खोल समुद्रात मासेमारी करणाऱया नौका सुरक्षिततेच्यादृष्टीने देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. गुजरात, कर्नाटक राज्यातील मलपी येथील नौकांसह हर्णे, नाटे या भागातील नौकाही देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत देवगडात पावसाचा जोर कायम  होता. दरम्यान, तालुक्यात कोठेही नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडलेल्या नाहीत.

Related posts: