|Friday, November 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » प्रेमभंगातून युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न

प्रेमभंगातून युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न 

हातावर ब्लेडने वार करीत विष केले प्राशन

प्रतिनिधी / मालवण:

 तालुक्यातील एका युवतीने प्रेमभंगातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. युवकाने लग्नास नकार दिल्याने युवतीने हातावर ब्लेडने वार करून विषारी द्रव प्राशन केले. घरातील मंडळींना युवती अत्यवस्थ झाल्याचे दिसून आल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

या युवतीचे प्रेमसंबंध शहरातील एक युवकाबरोबर होते. प्रेमसंबंधातून लग्नाच्याही आणाभाका घेण्यात आल्या होत्या. मात्र काही विषयांवरून दोघांत काही दिवसांपासून दुही निर्माण झाली होती. यातून दोघांचेही वाद झाल्याची माहिती पुढे येत आहे. युवतीने लग्नाचा हट्टा धरल्यानंतर युवकाने दोन पाय मागे जाण्याचा निर्णय घेतला. याचा राग युवतीला येऊन तिने थेट जीवन संपविण्यासाठी निर्णय घेत हातावर ल्बेडने वार करून घेत विष प्राशन केले. घरातील मंडळींनी तातडीने युवतीला खासगी रुग्णालयात दाखल केले. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Related posts: