|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » म्यानमारच्या सैन्याधिकाऱयांवर नरसंहाराचा खटला चालावा

म्यानमारच्या सैन्याधिकाऱयांवर नरसंहाराचा खटला चालावा 

जिनिव्हा

 रखाइन प्रांतात रोहिंग्या मुस्लिमांच्या नरसंहारासाठी म्यानमारच्या सैन्याधिकाऱयांवर खटला चालविला जावा, असे संयुक्त राष्ट्राच्या तपासकर्त्यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र तपासकर्त्यांनी सोमवारी अहवाल प्रसिद्ध केला असून यात रोहिंग्यांच्या नरसंहारासाठी म्यानमारचे सैन्याध्यक्ष मिन आंग हलाइंग यांच्यासमवेत 5 सैन्याधिकाऱयांना दोषी ठरविण्यात आले आहे. रोहिंग्यांच्या विरोधातील प्रक्षोभक विधाने आणि हिंसाचार रोखण्यास म्यानमारचे सरकार अपयशी ठरले. सैन्याच्या मोठय़ा अधिकाऱयांच्या विरोधात रखाइन प्रांतात हिंसाचार घडविल्याचे ठोस पुरावे मिळाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. म्यानमारने या अहवालावर अद्याप कोणतीही टिप्पणी केलेली नाही. मागील वर्षी ऑगस्टमध्ये दहशतवादी संघटना अराकान रोहिंग्या सॉल्व्हेशन आर्मीने म्यानमार पोलीस आणि सैन्याच्या सुमारे 30 चौक्यांवर हल्ला चढविला होता. यानंतर प्रांतात रोहिंग्या मुस्लिमांच्या विरोधात हिंसाचार भडकला होता. सुमारे 7 लाख रोहिंग्यांनी जीव वाचविण्यासाठी बांगलादेशात पलायन केले होते.