|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अमेरिका : व्हिडिओगेम स्पर्धेत गोळीबार, 3 ठार

अमेरिका : व्हिडिओगेम स्पर्धेत गोळीबार, 3 ठार 

वॉशिंग्टन

 अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील जॅक्सनव्हिले भागात रविवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. येथील एका रेस्टॉरंटमध्ये व्हिडिओ गेम स्पर्धेवेळी संशयित हल्लेखोरांनी जमावाला लक्ष्य करत बेछूट गोळीबार केल्याने अनेक जण जखमी झाले. घटनेनंतर पोलिसांनी जॅक्सनव्हिलेच्या दिशेने जाणारे सर्व मार्ग रोखले असून गोळीबार करणाऱया एका हल्लेखोराला कंठस्नान घातले आहे.

जखमेंना स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गोळीबाराच्या घटनेत हात असलेल्या हल्लेखोरांचा पोलीस युद्धपातळीवर शोध घेत आहेत. हल्ल्यानंतर पोलिसांनी लोकांना वाचविणे आणि हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी मोठी शोधमोहीम राबविली आहे. नागरिकांसाठी विशेष हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे.

असून नागरिकांना पूर्ण सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पराभवानंतर गेमरकडून गोळीबार

एका एंटरटेनमेंट कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या व्हिडियोगेम स्पर्धेदरम्यान गोळीबार झाला आहे. या स्पर्धेच्या लाइव्ह व्हिडिओत अनेकदा गोळय़ा झाडल्याचा आवाज ऐकू येतो. या स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक अमेरिकन फुटबॉल गेम मेडन खेळत होते, यातील एकाने पराभवानंतर गोळीबार केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. परंतु पोलिसांनी या माहितीची पुष्टी देण्यास नकार दिला.