|Sunday, December 16, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » वैमानिक तणावाखाली असल्यानेच विमान दुर्घटना

वैमानिक तणावाखाली असल्यानेच विमान दुर्घटना 

काठमांडू

 नेपाळच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या विमान दुर्घटनेबद्दल नवा खुलासा झाला आहे. वैमानिक मानसिक तसेच भावनात्मक तणावखाली होता, असे याप्रकरणाशी संबंधित अहवालातून समोर आले आहे. 12 मार्च रोजी बांगलादेशच्या ढाका येथून उड्डाण केल्यावर विमान काठमांडूच्या विमानतळावर दुर्घटनाग्रस्त झाले होते आणि यात 50 जणांना जीव गमवावा लागला होता. अमेरिकन-बांगलादेशी वैमानिक तणाव तसेच मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ होता. एका महिला कर्मचाऱयाने त्याच्या कौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने वैमानिक तणावाखाली होता. यानंतर त्याने कॉकपिटमध्ये धूम्रपान देखील केले होते.  वैमानिक आबिद सुल्तान प्रवासावेळी अनेकदा रडताना देखील दिसून आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पूर्व भागात विमान कोसळले होते. या दुर्घटनेवेळी 17 जणांना वाचविण्यास यश आले होते.

Related posts: