|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » काणकोणच्या सूरज स्वीट मार्टचे कारनामे चालूच

काणकोणच्या सूरज स्वीट मार्टचे कारनामे चालूच 

प्रतिनिधी/ काणकोण

काणकोणच्या जागृत नागरिकांनी वेळोवेळी इशारा आणि अन्न व औषध प्रशासनाच्या वारंवार होत असलेल्या तपासणीनंतर देखील काणकोणच्या सूरज स्वीट मार्टमध्ये खराब मिठाई विकण्याचा प्रकार चालूच असून काल जनार्दन भंडारी, संदेश तेलेकर, सम्राट भगत आणि अन्य कार्यकर्त्यानी सूरज स्वीट मार्टमधील ‘बरड’ लागलेल्या काजूच्या बियांची पाकिटे पोलिस स्थानकावर हजर केली.

त्यातील एक पाकिट चक्क 2016 सालचे तर दुसरे पाकिट जुलै महिन्याचे होते. दोन महिन्यांपूर्वी सदर दुकानात आढळलेल्या खराब मिठाईचे प्रकण बरेच गाजले होते. जागृत नागरिकांनी हा प्रकार अन्न आणि औषध प्रशासनातील अधिकाऱयांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सदर आस्थापन ज्या ठिकाणी मिठाई तयार करते त्या जागेला अन्न आणि औषध मंडळाने सील ठोकले होते.

शिवाय बंद माल न विकण्याची ताकीद दुकान मालकाला दिली होती, असे असताना सूरज स्वीट मार्ट काणकोण वासियांच्या जीवावरच उठला आहे. खराब मिठाई शोधून काढल्यानंतर जे जागृत नागरिक हा प्रकार उघडकीस आणतात, त्यांच्यावर  खंडणी वसूल करण्याचा आरेंप करण्यात येत आहे. हा एकंदर प्रकारच गंभीर स्वरूपाचा असून 25 आणि 26 रोजी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या दिनी तालुक्यातील मिठाई वाल्यांनी प्रचंड प्रमाणात गल्ला केला. ती मिठाई कशा स्वरूपाची  होती त्याचा शोध घेण्याची गरज काही युवकांनी काणकेंण पोलिस स्थानकावर जाऊन व्यक्त केली आहे.

काणकोण पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रशाल देसाई आणि जागृत नागरिकांच्या पथकाने नंतर सूरज स्वीट मार्टच्या दुकानाची तपासणी केली आणि अन्न व औषध प्रशासनाला याची खबर दिली आहे.

  चावडीवर भरणाऱया आठवडय़ाच्या बाजारात तर सर्रास भेसळयुक्त पदार्थ विकले जात असून फरसाण, शेव, चिवडा, त्याच बरोबर हळद पावडर, मिर्ची पावडर यांच्यात भेसळ आढळली असून शनिवारच्या बाजारात अकस्मात अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱयांनी तपासणी करून अंदाजे 60 हजार रू. च्या भेसळयुक्त मालाची विल्हेवाट लावली.

यापूर्ली एक लाख पेक्षा अधिक औषधाचा फवारा मारलेली फळे, आंबे जप्त करण्यात आले होती. तालुक्यातील लोकांना एकत्रित आणि स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध व्हावा या उद्देशाने वीस वर्षांपूर्वी तत्कालिन नगराध्यक्ष संतोष गावकर यांच्या प्रयत्नातून या आठवडय़ाच्या बाजाराला प्रारंभ झाला होता. मात्र, या बाजारात येणारे विक्रेते आरोग्याला अपायकारक अशा वस्तूची विक्री करायला लागले असून आता हा बाजारच नको असे म्हण्ण्याची पाळी काणकोण वासियांवर आलेली आहे.

 एका बाजूने खराब मिठाई, भेसळयुक्त फरसाण, भाजी विकण्याचे प्रकार चालू असतानाच पोळे चेकनाक्यावरून गुप्तपणे मासे वाहतूक वाहनांची तपासणी न करताच स्वता पोलिस सरंक्षणात वाहने सोडली जात असल्याचा गंभीर आरोप काणकोणच्या नागरिकांनी केला आहे. ही मासळी कुंकळळी येथील एका कारखान्यात पाठविली जात असल्याचे आता उघड झाले आहे. खुद्द माजी उपनगराध्यक्ष दिलीप केंकरे, जनार्दन भंडारी आणि अन्य नागरिकांनी हा प्रकार उघड केला आहे. आणि अशा जागृत नागरिकांवर सरकारी कामात अडथळा आणला जाते हा निकष लावून गुन्हे दाखल करण्याचे प्रकार सद्या चालू आहेत.

या संबधी जाब विचारण्यासाठी काही नागरिक पोलिस स्थानकावर गेले असता त्याना पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई उपलब्ध झाले नसल्याची माहिती मिळाली आहे. मात्र आपला लढा हा काणकाणवासियांच्या आरोग्याशी निगडीत असून हा लढा चालूच राहिल असा पवित्रा या नागरिकांनी घेतला आहे.

Related posts: