|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अन् लक्ष्मी देवीचा हार परत आला त

अन् लक्ष्मी देवीचा हार परत आला त 

प्रतिनिधी/ बेळगाव

दीड महिन्यांपुर्वी श्री लक्ष्मी देवीच्या मंदिरातील सोन्याचा हार चोरीस गेल्याचा प्रकार बेळगुंदी येथे घडला होता. मात्र ग्रामस्थांनी या चोरी प्रकरणी शपथ घ्यायला भाग पाडल्यानंतर तो हार पुन्हा देवीच्या गळय़ात आला आहे. या प्रकाराची अवघ्या पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे.

बेळगुंदी येथील श्री लक्ष्मी मंदिरात असणाऱया देवीच्या मूर्तीच्या गळय़ातून हार चोरीस गेल्याची घटना घडली होती. या प्रकराने गावामध्ये हळहळ व्यक्त झाली होती. या प्रकरणी पोलिसांतही तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतु त्यानंतर ग्रामस्थोंनी एकत्रित येवून देवीसमोर शपथ घेण्याचा कार्यक्रम राबविला. या शपथेमुळे ग्रामस्थांमध्ये सदर चोरीचा हार पुन्हा नक्की सापडेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला होता.

मागील चार दिवसांपूर्वी सदर हार देवीच्या गळय़ामध्ये पुन्हा दिसून आल्यामुळे ग्रामस्थांना सुखद आश्चर्याचा धक्का बसला आहे. चोरटय़ांनी देवीच्या अवकृपेचा धसका घेऊन सदर हार पुन्हा देवीला अर्पण केल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

काही दिवसांपूर्वी गावातील ग्रामदैवत श्री रवळनाथाच्या मंदिरातही असाच चोरीचा प्रकार घडला होता. तेथील ऐवजही अशाच प्रकारे पुन्हा परत मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे