|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कॅन्टरच्या ठोकरीने बँक कर्मचाऱयाचा मृत्यू

कॅन्टरच्या ठोकरीने बँक कर्मचाऱयाचा मृत्यू 

प्रतिनिधी / बेळगाव

भरधाव कॅन्टरने होंडा ऍक्टीव्हाला ठोकरल्याने बँक कर्मचारी जागीच ठार झाला. सोमवारी सायंकाळी काँग्रेस रोडवरील मिलिटरी महादेव मंदिराजवळ हा अपघात घडला. अपघातात डोक्मयाला जबर दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

विजय फकीरा काळे (वय 55, रा. महषी रोड, टिळकवाडी) असे त्या दुर्दैवी दुचाकीस्वाराचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी केए 22 ईझेड 8331 क्रमांकाच्या होंडा ऍक्टीव्हावरुन विजय हे आपल्या घरी जात होते. त्यावेळी गोगटे सर्कलहून काँग्रेस रोडकडे जाणाऱया केए 23 ए 5499 क्रमांकाच्या कॅन्टरची धडक बसून हा अपघात झाला.

विजय हे मूळचे काकतीवेस परिसरातील राहणारे होते. सध्या महषी रोड टिळकवाडी येथे त्यांचे वास्तव्य होते. शिवबसवनगर येथील एसबीआयच्या शाखेत ते काम करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, सून  असा परिवार आहे. या अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली होती. नागरिकांनी तातडीने पोलीस कंट्रोल रुमशी संपर्क साधून या अपघाताची माहिती दिली.

रहदारी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विजय यांनी हेल्मेट परिधान केले होते.  अपघातानंतर ते बाजूला सरकल्याने त्यांच्या डोक्मयाला जबर दुखापत झाली होती. 108 रुग्णवाहिकेतून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. त्यानंतर त्यांच्या खिशातील आधारकार्ड व ओळखपत्रावरुन त्यांची ओळख पटविण्यात आली.

खड्डय़ांचा बळी

काँग्रेस रोडवर खड्डय़ांचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना या मार्गावरुन ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्यामुळे खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात घडत आहेत. सोमवारी सायंकाळी हा अपघात झाला त्यावेळी रिमझीम पाऊस येत होता. खड्डे आणि अवजड वाहनांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहेत.

चौकट करणे

एएसआय बसवराज शिंदगार जखमी

काँग्रेस रोडवर झालेल्या अपघातानंतर या परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती. पहिल्या रेल्वेगेटजवळ वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या प्रयत्नात एएसआय बसवराज शिंदगार हे कार्यरत होते. त्याचवेळी एका कारने ठोकरल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.