|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » भर पावसातही वन सुरक्षा रक्षक पदासाठी निवड चाचणी

भर पावसातही वन सुरक्षा रक्षक पदासाठी निवड चाचणी 

बेळगाव / प्रतिनिधी

वन सुरक्षा पदाच्या नेमणूक प्रक्रियेच्या शारीरिक चाचणी आणि सामर्थ्य परीक्षेसाठी सोमवारीही भर पावसात उमेदवारांनी हजेरी लावली होती. येथील जिल्हा क्रीडांगण आणि पोलीस परेड ग्राऊंड येथे रविवारपासून ही प्रक्रिया सुरू आहे. वन खात्याच्यावतीने घेण्यात येत असणाऱया या निवड चाचणी प्रक्रियेत सोमवारी जिल्हा क्रीडांगण आणि पोलीस परेड ग्राऊंडवर 3 हजार उमेदवारांची शारीरिक चाचणी आणि सामर्थ्य परीक्षा घेण्यात आली. दि. 29 ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.

रविवारी झालेल्या या चाचणी प्रक्रियेत सुमारे 700 महिला उमेदवारांनी सहभाग  घेतला होता. वन सुरक्षा पदासाठी राज्यातील 94 जागांसाठी बेळगाव विभागात एकूण 9222 अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे शारीरिक चाचणी आणि सामर्थ्य परीक्षेसाठी उमेदवारांची गैरसोय होऊ नये यासाठी दि. 26 ते 29 ऑगस्ट या कालावधीत दररोज सुमारे 3 हजार उमेदवारांची निवड चाचणी घेण्यात येत असल्याचे वन खात्याच्या अधिकाऱयांनी सांगितले.

सोमवारी भर पावसातही निवड प्रक्रिया सुरू होती. यामध्ये जिल्हय़ातील सौंदत्ती, रामदुर्ग, बैलहोंगल तालुक्मयासह बिदर आणि गुलबर्गा जिल्हय़ातील असंख्य उमेदवारांनी सहभाग घेतला होता. या निवड चाचणीदरम्यान बेळगाव वनविभाग खात्याचे सीसीएफ करुणाकरन, डीसीएफ एम. व्ही. अमरनाथ, एसीपी संगोळ्ळी यांच्यासह शिवानंद नाईकवाडी व अन्य अधिकारी परीक्षक म्हणून उपस्थित राहत आहेत.