|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कारदगा पूल वाहतुकीस खुला

कारदगा पूल वाहतुकीस खुला 

वार्ताहर/ कारदगा

गेल्या आठ-दहा दिवसांपासून कारदगा, भोजदरम्यान दूधगंगा नदीवर असलेला पूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक बंद होऊन या भागातील वाहनधारकांना व प्रवाशांना लांब पल्ल्यावरून प्रवास करावा लागत होता. मात्र या पुलावरील पाणी गेल्याने 27 पासून या पुलावरून सर्व वाहतूक पूर्ववत सुरु झाली आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

कारदगा दूधगंगा नदीवरील पूल हा या भागातील वाहनधारकांबरोबर नागरिकांसाठी एकमेव दुवा आहे. या पुलावर नदीचे पाणी आल्यानंतर नागरिकांना लांबच्या पल्ल्यावरून प्रवास करावा लागत असल्याने पैसा व वेळ वाया जातो. गेल्या महिन्यात हा पूल 20 दिवस पाण्याखाली राहिला व सध्या आठ-दहा दिवस राहिला. त्यामुळे नागरिकांना फार त्रास सहन करावा लागला. या परिसरात वारंवार पाऊस सुरु होता. त्यामुळे नदीचे पाणी वाढले होते. पण दोन-तीन दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने 27 रोजी पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने या पुलावरून वाहतूक पूर्ववत सुरु झाली आहे.

पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

गेले दोन-तीन दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली होती. पण सोमवारी पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. येत्या आठवडय़ात पावसाने जोरदार हजेरी लावल्यास पुन्हा या पुलावर पुन्हा पाणी येणार अशी भीती निर्माण झाली आहे. तसेच सोमवारी झालेल्या पावसाने येत्या दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.