|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » मुंबईतल्या ट्राफिकने घेतला रूग्णाचा जीव

मुंबईतल्या ट्राफिकने घेतला रूग्णाचा जीव 

ऑनलाईन टीम / मुंबई :

वाढलेली वाहनांची संख्या आणि मेट्रोसारख्या प्रकल्पाच्या कामांमुळे गेल्या काही काळापासून मुंबईतील ट्रफिकची समस्या गंभीर झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनांचा तासनतास खोळंबा होत असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, ट्रफिक जॅममध्ये अडकल्याने वेळीच रुणालयात पोहोचू न शकल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईत मरोळ नाका परिसरात घडली आहे.

मोहम्मद खान असे ट्रफिकमध्ये रिक्षा खोळंबल्याने वेळीच उपचार मिळू न शकल्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 25 ऑगस्ट रोजी अंधेरी येथे राहणारे मोहम्मद खान यांच्या छातीत दुखू लागल्याने कुटुंबीय त्यांना रिक्षातून रुग्णालयात घेऊन निघाले. मात्र वाटेत मोठय़ा प्रमाणावर ट्रफिक असल्याने त्यांचा बराच काळ खोळंबा झाला. त्यामुळे मोहम्मद खान यांना वेळीच उपचार मिळू शकले नाहीत दरम्यान ते रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तसेच काही काळ आधी रुग्णालयात आणले असते तर त्यांचा जीव वाचवणे शक्मय झाले असते, असेही डॉक्टरांनी सांगितले.

जर वाटेत ट्रफिक जाम नसता तर आपण पाच मिनिटांत रुग्णालयात पोहोचता आले असते आणि आपल्या भावावर वेळीच उपचार झाले असते, असे मत मोहम्मद खानचा भाऊ अस्लम खान याने व्यक्त केले.