|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » एल्गार परिषद : नक्षली कनेक्शनवरून अटकस्त्र

एल्गार परिषद : नक्षली कनेक्शनवरून अटकस्त्र 

ऑनलाईन टीम / पुणे :

नक्षली सहभागाच्या संशयावरुन एल्गार परिषदेशी संबंधित काही जणांच्या घराची पुणे पोलिसांकडून झडती सुरु आहे. पुण्यातील एल्गार परिषदेला माओवाद्यांनी पैसे पुरवल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. त्यानंतर पुणे पोलिसांनी आता हैदराबाद, मुंबई, दिल्ली, हरियाणा, रांची या शहरांमध्ये झाडाझडतीला सुरुवात केली आहे.

 

पुणे पोलिसांच्या सहा पथकांकडून देशातील मुंबई, दिल्ली, हैदराबाद, रांची, गोवा आणि हरियाणा या शहरांमध्ये आज सकाळपासून माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या संशयितांवर कारवाई सुरू आहे. यामध्ये हैदराबादमध्ये माओवादी नेता आणि कवी वारावर राव यांच्याशी संबंधित व्यक्तींची चौकशी पुणे पोलिसांकडून सुरु आहे. मुंबईमध्ये अरुण फरेरा आणि व्हर्नोन गोन्सालवीस यांच्या घरांची झाडाझडती घेतली जाते आहे. दिल्लीमध्ये गौतम नवलखा यांच्या घरात तपास सुरु आहे. तर सुधा भारद्वाज यांच्या रांचीमधील घरी पोलिसांची कारवाई सुरु आहे. तिकडे गोव्यात आनंद तेलतुंबडे यांच्या घरी पुणे पोलिस चौकशी करत आहेत.