|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » लिलावातून होणार दंडाची वसुली

लिलावातून होणार दंडाची वसुली 

प्रतिनिधी / मालवण:

अनधिकृत गौण खनिज वाहतूक केल्याप्रकरणी तहसीलदार समीर घारे यांनी पकडलेल्या चार डंपरच्या मालकांनी दंडात्मक रक्कम भरलेली नसल्याने चारही डंपरचा लिलाव करण्याची प्रक्रिया महसूल प्रशासनाने सुरू केली आहे. डंपरचा लिलाव करून दंडात्मक रक्कम वसूल करण्यास परवानगी मिळावी, यासाठी तहसीलदारांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. लवकरच या प्रकरणी अंतिम कार्यवाही करण्यात येणार आहे.

 डंपर (एमएच-07-एस-0560) यात वाळू सापडल्याने 2 लाख 68 हजार 364 रुपये दंड, डंपर (एमएच-07-4599) व (एमएच-07-पी-6399) यात खडी सापडल्याने प्रत्येकी 2 लाख 54 हजार 800 रुपये दंड तसेच डंपर (एमएच-07-सी-5126) यात काळा दगड सापडल्याने त्याला 2 लाख 44 हजार 800 रुपये दंड प्रशासनाने केला होता. हा दंड न भरल्याने अखेर प्रशासनाने गाडय़ांचा लिलाव करून दंड वसूल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. कुंभारमाठ येथे ट्रक्टरमधून (गाडी नंबर 2118) खडीची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी ट्रक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे. या ट्रक्टर मालकाला नोटीस देण्यात आली आहे.