|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » भाटय़े किनारी ‘हॉकबील’ जातीचे मृत कासव

भाटय़े किनारी ‘हॉकबील’ जातीचे मृत कासव 

मंगळवारी सकाळची घटना

शेवाळासोबत प्लास्टीक खाल्ल्याने मृत्यू झाल्याचा मत्स्यतज्ञांचा अंदाज

प्र†ितनिधी  /रत्नागिरी

रत्नागिरीतील भाटय़े समुद्र किनारी ‘हॉकबील’ जातीचं एक कासव मृतावस्थेत मंगळवारी  मिळून आले. समुद्रातील शैवाळ खाताना त्यानं प्लास्टीक खाल्ल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज मत्स्यतंज्ञाकडून वर्तवण्यात आला आहे.

भाटय़े समुद्र किनारी मृतावस्थेत मिळून आलेले त्या कासवाचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. मंगळवारी सकाळी समुद्रावर फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या हे मृत कासव नजरेस पडले. त्याविषयीची खबर येथील वनविभागाला देण्यात आली. जवळपास दोन ते अडीच फुट लांब आणि दिड ते दोन फुट रुंदीचे हे कासव आहे

‘हॉकबील’ जातीची कासवे खोल समुद्रात राहत असल्याचे सांगण्यात येते. समुद्रातलं शेवाळ या कासवाचे अन्न असते. शेवाळा सोबत प्लॅस्टिक खाल्याने या कासवाचा मृत्यू झाला असण्याची शक्यता मत्सतज्ञांनी व्यक्त केली आहे. भाटय़े किनारी यापुर्वी देखील ‘ऑलिओ रिडले’ जातीची कासव मृतावस्थेत सापडली आहेत. मात्र आता हॉकबील जातीचं कासव मृतावस्थेत सापडल्यामुळे या कासवांच्या संरक्षणाचा विषय प्रकर्षाने पुढे आला आहे.

Related posts: