|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » शिक्षणासाठी मदत करण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार, मौलवीला अटकेत

शिक्षणासाठी मदत करण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार, मौलवीला अटकेत 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुण्यात शिक्षणासाठी मदत करण्याच्या बहाण्याने एका मौवलीने मुंबईत राहणाल्या एका तरूणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. दत्तवाडी पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून 50 वर्षीय मौलवीला अटक करण्यात आली आहे.

मुंबईतील तरूणीला पुण्यात उच्च शिक्षणासाठी मदत करतो. असे या मौलवीने सांगितले होते. हा मौलवी मुंबईत तरूणीच्या घराशेजारी येत असे, यादरम्यान त्याची तरूणीशी ओळख झाली. तरूणीने या मौलवीला गुरू मानले होते. या तरूणीला बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी पुण्याला जायचे होते. त्यामुळे पुण्यात मुलीचे हॉस्टेल पाहा, असे तिच्या कुटुंबीयांनी मौवलीला सांगितले होते. परंतू हॉस्टेल उपलब्ध नसल्याने पुण्यातील हडपसरमध्ये माझ्या घरी राहता येईल, असे मौलवीने तिच्या कुटुंबीयांना सांगितले.त्यामुळे तरूणी हडपसरमध्ये मौलवीच्या घरी राहूलागल्यानंतर एक दिवस मौलवीने त्याची पत्नी बाहेर गेल्यावर या तरूणीचे आक्षेपहार्य फोटो काढले.तसेच तिच्यावर अतिप्रसंग केला. याशिवाय मुंबईतही वेगवेगळय़ा ठिकाणी नेऊन आत्याचार केले. संबंधित प्रकार कोणाला सांगितले तर आई वडिलांना ठार करेन अशी धमकीही दिली. मौलवीच्या धमकीमुळे ही तरूणी शांत राहिली.मात्र मुंबईत परतल्यावर संपूर्ण प्रकार आई-वडिलांना सांगितला, या तक्रारीची दखल घेत मौलवीविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.