|Friday, November 16, 2018
You are here: Home » Top News » आंबेनळी अपघात, प्रकाश देसाईंची नार्को टेस्ट करा ; मृत नातेवाईकांची मागणी

आंबेनळी अपघात, प्रकाश देसाईंची नार्को टेस्ट करा ; मृत नातेवाईकांची मागणी 

ऑनलाईन टीम / आंबेनळी :

आंबेनळी घाटातील बस अपघातात बचावलेले एकमेव कर्मचारी प्रकाश सावंत-देसाई यांच्याबाबतचा मृतांच्या नातेवाईकांच्या मनातील संशय अजूनही कमी झालेला नाही. या अपघाताला एक महिना पूर्ण झाला तरी सावंत-देसाई यांच्याबाबत कोणतीच कारवाई न झाल्याने या अपघातातील मृतांचे नातेवाईक बुधवारी कोकण कृषी विद्यापीठात घुसले. या अपघातात एकट्या बचावलेल्या प्रकाश सांवत-देसाईला पाठीशी घालणाऱया अधिकाऱयांची चौकशी करण्याची मागणी यावेळी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर देसाई यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. जर यात ते दोषी निघाले तर त्यांना कामावरून बडतर्फ करा असेही मृतांच्या नातेवाईकांनी म्हटले आहे.

 

28 जुलैच्या सकाळी साडे 10 च्या सुमारास आंबेनळी घाटात दापोली कृषी विद्यापीठाच्या बसला अपघात झाला आणि बसमधील 30 जणांचा मृत्यू झाला. हृदय हेलावून टाकणाऱया या घटनेत प्रकाश सावंत देसाई वाचले. त्यावरुन मृतांच्या नातेवाईकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

 

Related posts: