|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » विष पेरण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करून नका : नरेंद्र मोदी

विष पेरण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करून नका : नरेंद्र मोदी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

विष पेरण्यासाठी किंवा द्वेष पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जाऊ नये असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  केले आहे. एका चांगल्या समाजासाठी हे अत्यंत चुकीचं असल्याचंही ते बोलले आहेत. वाराणसीमधील भाजपा कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांशी नरेंद्र मोदींनी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, प्रत्येकाने सोशल मीडियाचा वापर विष पेरण्यासाठी तसंच द्वेष पसरवण्यासाठी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मात्र सोशल मीडियाचा वापर आजूबाजूच्या चांगल्या गोष्टींसाठी नक्कीच करा हेदेखील त्यांनी सांगितलं.

सोशल मीडियावर चुकीचे मेसेज पसरवणे समाजासाठी धोकादायक असल्याचंही यावेळी नरेंद्र मोदी बोलले आहेत. ‘अनेकदा लोक सभ्यतेच्या मर्यादा ओलंडतात. काही चुकीचं ऐकतात, पाहतात आणि तेच फॉरवर्ड करतात. समाजासाठी हे किती धोकायदाक आहे याचा ते विचारच करत नाहीत. काही लोक समाजाला शोभणार नाहीत अशा शब्दांचा वापर करतात. महिलांबद्दल ते काहीही आक्षेपार्ह लिहितात’, असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.