|Monday, September 24, 2018
You are here: Home » leadingnews » कोरेगाव भिमा हिंसाचार ; पाचही आरोपींना नजरकैदेत ठेवण्याचे सुप्रिम कोर्टाचे आदेश

कोरेगाव भिमा हिंसाचार ; पाचही आरोपींना नजरकैदेत ठेवण्याचे सुप्रिम कोर्टाचे आदेश 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारद्वाज, गौतम नवलखा, अरुण फरेरा, वरनॉन गोन्साल्वीस आणि वरवर राव या आरोपींना 5 सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश सुप्रिम कोर्टाने दिले आहेत. भीमा-कोरेगाव हिंसेप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना सुप्रिम कोर्टाने नजरकैदेत ठेवण्यास सांगितलं आहे.

 

तसेच महाराष्ट्र सरकारला यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यासही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. यासंदर्भात न्यायालयानं फडणवीस सरकारनं नोटीसही बजावली आहे. या पाचही आरोपींना 5 सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्यात येणार असून, पुढील सुनावणी 6 सप्टेंबरला होणार आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते सुधा भारद्वाज यांच्या ट्रान्झिट रिमांडलाही सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. या प्रकरणात भाजपा नेते हंसराज अहिर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांचं अशा प्रकारे खच्चीकरण करणं योग्य नाही. तसेच ते खरोखर गुन्हेगार नसतील तर न्यायालयानं त्यांना नक्कीच जामीन देईल, यावर आमचा विश्वास आहे, असं हंसराज अहिर म्हणाले आहेत.

 

Related posts: