|Friday, September 21, 2018
You are here: Home » Top News » सर्व हिंदूत्ववाद्यांना दहशतवादी ठरवू नका : शिवसेना

सर्व हिंदूत्ववाद्यांना दहशतवादी ठरवू नका : शिवसेना 

ऑनलाईन टीम / मुंबई :

सर्वच हिंदुत्ववादी लोकांना दहशतवादी ठरवले जाऊ नये, पानसरे, दाभोलकरांची हत्या करणारे कोणीही असोत, त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. पण नगास नग उभे करून हिंदूंना दहशतवादी ठरवू नका, असे म्हणत शिवसेनेने सनातन संस्थेचे अप्रत्यक्षरित्या समर्थन केले. उद्या देशावर संकट येईल तेव्हा हिंदूंची सर्व मने आणि मनगटे अशा कारवायांमुळे आधीच विझून गेलेली असतील, अशी भीती व्यक्त करत नक्षलवादी समर्थकांना ‘कथित’ नक्षलवादी समर्थक म्हटले जात आहे. पण अटकेत असलेल्या हिंदुत्ववादींचा उल्लेख थेट ‘हिंदू कट्टरपंथीय’ असा केला जातो असेही सेनेने म्हटले आहे.

 

रामजन्मभूमीच्या संघर्षात जे जीवावर उदार होऊन लढले त्यांची काँग्रेस राजवटीत फरफट झाल्याची टीका त्यांनी केली. ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून शिवसेनेने हिंदुत्ववादी संघटनांवर होत असलेल्या कारवाईवर भाष्य केले. राज्यात आणि केंद्रात भाजपाचे राज्य असतानाही हिंदू दहशतवादाचे ढोल बडवले जात आहेत. याचा सरकारने खुलासे करण्याची गरज असल्याची मागणी त्यांनी केली.

 

Related posts: