|Saturday, July 20, 2019
You are here: Home » Top News » सचिन अंदुरेच्या सीबीआय कोठडीत दोन दिवसांची वाढ

सचिन अंदुरेच्या सीबीआय कोठडीत दोन दिवसांची वाढ 

ऑनलाईन टीम / मुंबई :

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केलेल्या सचिन अंदुरेच्या सीबीआय कोठडीत पुणे न्यायलयाने दोन दिवसांची वाढ केली आहे. सचिन आंदुरे आणि शरद कळसकर या दोघांची एकत्रित चौकशी करायची असल्याने सीबीआय कोठडी वाढवून देण्याची मागणी सीबीआयच्या वतीने करण्यात आली.

महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणांनी ऑगस्टमध्ये सचिन अंदुरेला अटक केली होती. गुरूवारी अंदुरेला सीबीआयने पुणे न्यायलयात हजर केले. सरकारी वकिलांनी सचिनची सीबीआय कोठडी दोन दिवसांनी वाढवून द्यावी, अशी विनंती केली. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांची एकत्रित चौकशी करणे गरजेचे असल्याने कोठडी वाढवून देण्याची आवश्यकता आहे, असा युक्तिवाद सीबीआयच्या वतीने करण्यात आला.न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर सचिन अंदुरेच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे.