|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » गुप्तधनासाठी चिमुकल्या युगाचा बळी , तांत्रिकांना अटक

गुप्तधनासाठी चिमुकल्या युगाचा बळी , तांत्रिकांना अटक 

ऑनलाईन टीम / मुंबई :

चंद्रपुरातील ब्रह्मपुरी तालुक्मयातील खंडाळा इथून बेपत्ता झालेल्या दोन वषीय युग मेश्रामची गुप्तधनाच्या लालसेतून हत्या झाल्याचे समोर आलं आहे. घराशेजारील तांत्रिकाने युगचा बळी दिला. या प्रकरणी सुनील आणि प्रमोद बनकर यांना पोलिसांनी अटक केली आहे.

 

केसात तीन भोवरे असलेल्या युग मेश्राम 22 ऑगस्ट रोजी घराशेजारी खेळताना अचानक बेपत्ता झाला होता. युग मेश्रामच्या घराजवळच असलेल्या एका तनशीच्या ढिगाऱयात काल (29 ऑगस्ट) त्याचा मृतदेह आढळला. पोलिसांची तीन पथके त्याचा शोध घेत होती. मात्र काल पोलिसांना घराशेजारीच त्याचा मृतदेह आढळला.

 

या प्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अखेर युग मेश्रामाचा नरबळीच असल्याचे सुनील आणि प्रमोद बनकरच्या चौकशीतून समोर आले. घरासमोर खेळणाऱया युगला चॅकलेटचं आमिष दाखवून हे आरोपी त्याला घेऊन गेले. त्यानंतर युगची पूजा करुन त्याची हत्या केली. गुप्तधनाच्या लालसेपोटी युगचा बळी दिला.