|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » मल्ल्याला देणार कसाबची कोठडी

मल्ल्याला देणार कसाबची कोठडी 

वातानुकूलित बराकीसह आर्थर रोड कारागफहात रंगरंगोटीचे काम सुरू

मुंबई / प्रतिनिधी

देशांतील बँकांना कोटय़वधींचा गंडा घालणाऱया विजय मल्ल्यासाठी 26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची कोठडी सज्ज झाली आहे. इंग्लंडहून लवकरात लवकर मल्ल्याचे प्रत्यार्पण होणार असल्याने आर्थर रोड कारागृह प्रशासनाने राज्य सरकारच्या आदेशावरुन जय्यत तयारी केल्याची माहिती दिली.

आर्थर रोड कारागफहातील बराक क्रमांक 12 चे स्वरुप बदलण्याचे काम गेल्या महिन्याभरापासून जोरात सुरू आहे. बराकमधील फरशी बदलण्यात आली असून भितींचे रंगकामदेखील पूर्ण झाले आहे. तसेच, स्वच्छतागृहाचीही दुरुस्ती करण्यात आली आहे. बराक क्रमांक 12 मध्ये यापूर्वी मुंबई 26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आले होते. दरम्यान, भारतीय कारागफहांची अवस्था अत्यंत वाईट असल्याचे सांगत विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी विरोध दर्शवला होता. यासाठी कारागफह प्रशासनाकडून एवढी जय्यत तयारी करण्यात येत असल्याचे सांगितले. यापूर्वी आर्थर रोड कारागफहाच्या सुरक्षिततेबाबतचा अहवाल भारताकडून लंडन कोर्टाला सादर करण्यात आला होता. यामध्ये सीबीआयने कारागफहाच्या नूतनीकरणाचे व्हिडीओ शूटिंगही सादर करण्यात आले आहे. पीडब्ल्यूडीचे कंत्राट हाती घेणाऱया प्रमेश कन्स्ट्रक्शन्सने बराकीच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले होते. कोठडीच्या रंगरंगोटीसह बराक क्रमांक 12 कडे जाणाऱया मार्गाचीही दुरुस्ती करण्यात आली आहे.

लंडन कोर्टात मल्ल्याने, आर्थर रोड कारागृहामध्ये नैसर्गिक प्रकाश येण्याची सोय नाही, सांगितले होते. त्यावर या बराकीत सूर्यप्रकाशासाठी एका भिंतीवर काळा रंग लावण्यात आला. 10 ऑगस्टला सीबीआयचे अधिकारी कोठडीचे व्हिडीओ शूटिंग करण्यासाठी गेले असता ते सदर कामापासून नाखूश होते. त्यानंतर 13 ऑगस्टपर्यंत पुन्हा कोठडीची डागडुजी करून पुन्हा 16 ऑगस्टला सीबीआयच्या अधिकाऱयांनी व्हिडीओ शूटिंग केल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले. तसेच, छगन भुजबळ यांना ठेवण्यात आलेल्या कोठडीचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

कारागफहांचा दर्जा सुधारण्यासाठी डागडुजी

कारागृह प्रशासनाचे विशेष पोलीस महानिरिक्षक राजवर्धन सिंग यांनी सांगितले की, कारागफहांचा दर्जा सुधारण्यासाठी डागडुजीचे काम सुरू करण्यात आले आहे. सरकारकडून कारागफहांच्या नूतनीकरणासाठी निधी देण्यात आला होता. याअंतर्गत रंगरंगोटी करण्यात आली आहे.

Related posts: