|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » खूनप्रकरणातील आरोपी घरफोडीत अटक

खूनप्रकरणातील आरोपी घरफोडीत अटक 

प्रतिनिधी /कागल :

रात्रीत नऊ दुकानफोडी करणाऱया चोरटय़ांना कागल पोलिसांनी गुरुवारी अटक केली. सुनील तुकाराम धोत्रे (वय 30, रा. परभणी), सुरज नितीन जाधव (वय 19, रा. हिंगोली) अशी त्यांची नावे आहेत. प्रकाश (संपूर्ण नाव समजू शकले नाही) हा अद्याप फरार आहे. न् परभणी पोलिसांनी एका चोरीप्रकरणात चौकशी करताना हे कागल चोरीप्रकरण उघडकीस आले. यातील सुरज जाधव हा सांगली खूनप्रकरणातील फारार संशयित आरोपी आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कागल शहरामध्ये 24 जुलै रोजी  रात्रीत दोन मेडिकल दुकाने, बिअर शॉपी, बेकरी, पानपट्टी, मोबाईल शॉप, कापड दुकाने चोरटय़ांनी फोडली होती. रोकडसह सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता. पार्वती फूडस्च्या सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले होते. कागल पोलिसांनी कागल चोरीला गेलेली दुचाकी ताब्यात घेतली होती.

परभणीतील घडय़ाळाच्या दुकानामध्ये 55 हजार रुपयांचे घडय़ाळ चोरताना दोन चोरटय़ांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले होते. तत्पूर्वी कागल पोलिसांनी येथील चोरीची माहिती परभणी पोलिसांना दिली होती. परभणी पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी कागलमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. याचबरोबर आंबेजोगाई या ठिकाणी केलेल्या चोऱयाही उघड झाल्या. परभणी येथील त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपली. कागलचे पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नासीरखान पठाण, मोहन वाटुंगे, धनंजय तळपाडे यांच्या टीमने परभणी येथे संबंधित चोरटय़ांना ताब्यात घेतले. गुरुवारी रितसर त्यांना कागल पोलिसांकडून अटक करण्यात आली.