|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News »  मुढेंविरोधातील अविश्वास प्रस्ताव मागे घ्या ; मुख्यमंत्र्यांचे आदेश

 मुढेंविरोधातील अविश्वास प्रस्ताव मागे घ्या ; मुख्यमंत्र्यांचे आदेश 

ऑनलाईन टीम / नाशिक :

नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव रद्द होण्याची चिन्ह आहेत. कारण,खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकाराम मुंढेंविरोधातील अविश्वास ठराव मागे घ्या, असा आदेश दिला आहे. त्यानुसार उद्या होणाऱया महासभेत अविश्वास प्रस्ताव मागे घेण्यात येईल, असे महापौर रंजना भानसी यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे नाशिक भाजपामध्ये खळबळ उडाली असून भाजपा नगरसेवकांना दणका मिळाला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठरावाबाबत शनिवारी (1 सप्टेंबर) विशेष महासभा घेण्यात येणार होती. मात्र तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुंढेंवर विश्वास दाखवत त्यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, महापालिकेतील सर्व पक्षीय नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर अखेर मुंढे यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. मोकळय़ा भूखंडावरील करवाढ पूर्णतः रद्द करतानाच नवीन वार्षिक भाडेमूल्य आकारणीत केलेली सुमारे तिप्पट वाढ पन्नास टक्क्मयांनी मागे घेतली आहे. गुरुवारी (30 ऑगस्ट) महापालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेत मुंढे यांनी आपल्या 31 मार्च रोजीच्या अधिसूचनेत शुद्धीपत्रक काढण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर महापौरांसह अन्य पदाधिकाऱयांशी चर्चा करून दरवाढ मागे घेतल्याचे सांगितले.