|Monday, November 19, 2018
You are here: Home » Top News » मोदी नेपाळमध्ये गेले आहेत ,कारण तिथे थापा आहेत : राज ठकारे

मोदी नेपाळमध्ये गेले आहेत ,कारण तिथे थापा आहेत : राज ठकारे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमध्ये गेले आहेत, कारण तिकडे थापा आहेत, अशी कोपरखळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. मराठवाडा दौऱयावर असलेल्या राज ठाकरे यांनी बीडमध्ये आज पत्रकारांशी संवाद साधला.

नोटबंदीचा निर्णय फसला तर मला भर चौकात शिक्षा द्या असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले होते. आता नोटबंदी फसली आहे. त्यामुळे लोकांनी मोदींना पत्र लिहून चौकात बोलावले पाहिजे, असे टीकास्त्र राज ठाकरे यांनी सोडले. राज ठाकरे कालपासून मराठवाडा दौऱयावर आहेत. काल औरंगाबादनंतर आज त्यांनी बीड जिह्याचा दौरा केला. रुपयाच्या अवमूल्यनावरुनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. रुपयाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे अवमूल्यन झाले आहे, असे राज म्हणाले.

 

Related posts: