|Saturday, July 20, 2019
You are here: Home » Top News » विद्याविहार स्थानकाजवळ ट्रक उलटला, दोन जखमी

विद्याविहार स्थानकाजवळ ट्रक उलटला, दोन जखमी 

ऑनलाईन टीम/ मुंबई :

मध्य रेल्वेवरील विद्याविहार स्थानकाजवळ ट्रक उलटल्याने मोठी दुर्घटना झाली आहे. विद्याविहार स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. 1वरील तिकीट खिडकीजवळच्या रस्त्यावर हा ट्रक कलंडला असून, विटांनी भरलेल्या या ट्रकखाली पाच मजूर अडकले होते. दरम्यान, या मजुरांना बाहेर काढण्यात आले असून गंभीर जखमी झालेल्या दोन मजुरांनी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज दुपारच्या सुमाराचे विटांनी भरलेला हा ट्रक विद्याविहार स्थानकातील तिकिटी खिडकीजवळ उलटला होता. टायर फुटल्याने हा ट्रक उलटल्याची प्राथमिक माहिती आहे.