|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » अजित पवार, अव्हाड,मुक्ता दाभोळकर होते ‘हिटलिस्ट’वर : एटीएसचा दावा

अजित पवार, अव्हाड,मुक्ता दाभोळकर होते ‘हिटलिस्ट’वर : एटीएसचा दावा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

नालासोपारा शस्त्रसाठय़ानंतर एटीएसने एका धक्कादायक खुलासा केला आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव, मुक्ता दाभोळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि रितू राज यांचे नाव हिललिस्टवर होती, असा दावा एटीएसने न्यायालयात केला .

 

एटीएसने गेल्या आठवडय़ात शनिवारी घाटकोपर येथील भटवाडीतून अविनाश पवार या तरूणाला बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (यूएपीए) अटक केली होती. अविनाश पवारची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी केस डायरीचे वाचन केले. त्यावेळी हिंदू धर्माविरुद्ध बोलणारे आणि अजित पवार, जितेंद्र आव्हाड, श्याम मानव, मुक्ता दाभोळकर, रितू राज ’हिटलिस्ट’वर होते असल्याचे केस डायरीतून नावे उघड झाली. त्याचप्रमाणे पवारने काही ठिकाणांची रेकी केली असल्याची माहिती एटीएसने न्यायालयात दिली. तसेच पवारने राज्याबाहेरून शस्त्र प्रशिक्षण घेतले होते.