|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दोडामार्गला केरळसाठी दीड लाखाची मदत

दोडामार्गला केरळसाठी दीड लाखाची मदत 

प्रतिनिधी / दोडामार्ग:

केरळ राज्यावर ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी देशभरातून मदत सुरू आहे. दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांनाही एकत्रित येत केरळसाठी 1 लाख 57 हजार रुपयांची मदत जमा केली. केरळ राज्याचे मुख्यमंत्री यांच्या खात्यावर ही मदत भरण्यात आली.

केरळ राज्यात नैसर्गिक आपत्तीत प्रचंड नुकसान झाले. या संकटातून सावरण्यासाठी केरळला देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. तालुक्यातील जि. प. शाळा सासोली हेदूस व जि. प. शाळा सोनावल येथील विद्यार्थ्यांनी केरळला मदत केली होती. त्यानंतर तालुक्यातील नागरिकांनी एकत्रित येत 1 लाख 57 हजार रुपयांची मदत गोळा केली. ही मदत केरळ राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या खात्यावर जमा केल्याची माहिती अनिल कुमार उर्फ अण्णा यांनी दिली.