|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » उद्योग » इंडिया पोस्ट पेमेन्ट्स बँकेचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

इंडिया पोस्ट पेमेन्ट्स बँकेचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ग्रामीण भागात बँकिंग सेवा पोहोचण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेन्ट्स बँकेचे आज, शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. नवी दिल्लीतील तल्कतोरा स्टेडियमवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून एकाचवेळी देशातील 650 शाखा आणि 3,250 सेवा केंद्रे सुरू होणार आहेत, असे सांगण्यात आले.

ग्रामीण भागातील सामान्य नागरिकाला सहज उपलब्ध, परवडणाऱया आणि विश्वासार्ह सेवा देत केंद्र सरकारचे आर्थिक स्वायलंबनाचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल असे सांगण्यात आले. या बँकेत सरकारचा 100 टक्के हिस्सा असून पोस्ट विभागाच्या मदतीने संपूर्ण देशभरातील तीन लाखापेक्षा अधिक पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांच्या माध्यमातून बँकिंग सेवा देण्यात येईल. 31 डिसेंबर 2018 पर्यंत देशातील सर्व 1.55 लाख पोस्ट ऑफिसेस या बँकिंग प्रणालीबरोबर जोडण्यात येतील.

आयपीपीबीकडून बचत आणि चालू खाते, पैशांचे हस्तांतरण, थेट अनुदान, बिल आणि युटिलिटीचे देयक, उद्योग आणि व्यापाऱयांसाठी देयकाची सेवा पुरविण्यात येईल. विमा कंपन्यांबरोबर भागीदारी केली असून कर्ज आणि गुंतवणूक संबंधित सेवा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बचत खातेधारकांना प्रतिवर्षी 4 टक्के व्याज देण्यात येईल. बचत खात्यामध्ये किमान शिल्लक ठेवण्याची गरज भासणार नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाने आयपीपीबीसाठी 1,435 कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली आहे.