|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मराठा आरक्षणासाठी फळ विक्रेत्यांचा ठिय्या

मराठा आरक्षणासाठी फळ विक्रेत्यांचा ठिय्या 

शिवाजी चौकातील शौर्य पीठास पाठींबा

प्रतिनिधी/ कोल्हापूर

  मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी चौकात सकल मराठा शौर्य पीठातर्फे सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनास गुरुवारी फळ विक्रेत्यांनी पाठींबा दिला. तसेच हातागाडय़ांसह आदोलन स्थळी ठिय्या मांडत आरक्षण तातडीने देण्याची मागणी केले. ठिय्या आदोलनामध्ये फळ विक्रेते रमेश पाटील, उत्तम जाधव, मारुती शिंदे, युनूस वडगांवकर, मनोहर बींदगे, मुस्ताक चाबुकस्वार, शकील शेख, अब्दुल बागवान, हुसेन शेख, सलीम चाबुकस्वार, मनोहर महाजन आदींसह फळविक्रेते मोठयासंख्येने सहभागी झाले होते.

 दसरा चौकात पाठिब्याचा ओघ कायम

 दसरा चौकात सुरु असलेल्या ठिय्या आंदेलनास गुरुवारी कागल तालुक्य़ाती मौजे करनुर येथील श्रीकृष्ण सेवा संस्थेचे चेअरमन विश्वास पाटील, जयसिंग घाटगे, शरद चव्हाण, प्रवीण कांबळे, इम्रान नाइकवडे, युवराज शिंदे, आप्पासो गाडेकर, स्वप्निल पाटील, अविनाश कांबळे आदींनी भेट देत पाठींबा दर्शविला. तसेच उद्योगपती रणजीत जाधव, मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र मंडलिक, प्रमोद पाटील, निलेश माने, संदीप ढेरे, भरत चौगुले, प्रदीप पाटील, गुंडाराम पाटील, अशोक खोत, अशोक गायकवाड, बाबासो महाजन आदींसह तारदळ गावच्या ग्रामस्थांनी भेट देत पाठींबा दिला.

 

 

 

 

 

Related posts: