|Friday, November 16, 2018
You are here: Home » Top News » पुण्यात फ्लेक्स लावल्यावरून वाद :तरूणाची हत्या

पुण्यात फ्लेक्स लावल्यावरून वाद :तरूणाची हत्या 

ऑनलाईन टीम / पुणे :

 दहीहंडीचे फ्लेक्स लावण्यावरून झालेल्या वादातून पाच जणांनी एकावर तलवारीने वार करून निघृण हत्या केल्याचा प्रकार पुण्यातील सिंहगड भागातील माणिकबाग परिसरातलि मध्यरात्री ही घटना घडली आहे.

अक्षय गडशी असे हत्या करण्यात आलेलया तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी निलेश चौधरी, सागर दारवडकर आणि त्यांच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय आणि आरोपी एकाच भागातील आहेत. काही दिवसांपूर्वी आरोपी आणि अक्षय यांच्यात दहीहंडीचा फ्लेक्स लावण्यावरून वाद झाला होता. त्या वादातून पाच जणांच्या टोळक्मयाने मध्यरात्री माणिकबाग येथील पेट्रोल पंपासमोर अक्षयला गाठून त्याच्यावर तलवारीने वार करून त्याची हत्या केली.

 

शहरात दहीहंडी मंडळाकडून मोठ-मोठे शुभेच्छा आणि आयोजित कार्यक्रमाचे फ्लेक्स लावले जात आहेत. त्यातून दोन गटात किरकोळ वादही होत आहेत. मात्र, शनिवारी मध्यरात्री याच वादातून थेट तरुणाला संपवल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

 

Related posts: