|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Top News » मुंबईतील आठवीतल्या पाच विद्यार्थिनी काल दुपारपासून बेपत्ता

मुंबईतील आठवीतल्या पाच विद्यार्थिनी काल दुपारपासून बेपत्ता 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आठवीत शिकणाऱया पाच विद्यार्थिनी शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता झाल्याची घटना मुंबईत घडली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर कुलाबा पोलीस ठाण्याच्या बाहेर रात्रभर शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, या विद्यार्थिनी आठवीत शिकत आहेत. या विद्यार्थिनींचा काल ओपन डे म्हणजे परीक्षेचा निकाल होता. त्यात मुलींना परीक्षेत गुण कमी मिळाल्याने त्या नाराज झाल्या. त्यांची शाळा दुपारी अडीच वाजता सुटते, मात्र शाळा सुटल्यावरही मुली घरी आल्या नाहीत.चिंताग्रस्त पालकांनी थेट शाळेत आणि नंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली. कुलाबा पोलिसांची विविध पथके या मुलींचा शोध घेत आहेत. आतापर्यंत सर्व विभागांसह, समुद्र किनारे देखील शोधून झाले आहेत. त्यामुळे आता पालकांची चिंता अजून वाढली आहे.

 

Related posts: