|Monday, July 22, 2019
You are here: Home » Top News » वाहतूक कोंडीमुळे हिंजवडीतील 56 कंपन्यांचे स्थलांतर

वाहतूक कोंडीमुळे हिंजवडीतील 56 कंपन्यांचे स्थलांतर 

ऑनलाईन टीम/ पुणे :

वाहतूक कोंडी आणि पायाभूत सोयी सुविधांचा अभाव यांच्यामुळे हिंजवडीमधील 56 कंपन्यांनी हिंजवडी आयटी पार्कमधून स्थलांतर होण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये

6 बहुराष्ट्रीय आणि 50 लहान कंपन्यांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये दोन मोठय़ कंपन्यांनी वाहतूक कोंडीला वैतागून बालेवाडी आणि खराडी परिसरात आपला मुक्काम हलवला आहे. यानंतर आता 56 कंपन्या हिंजवडीला रामराम करणार आहेत.

 

राज्यातील सर्वात मोठे आयटी पार्क अशी हिंजवडीची ओळख आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आणि राष्ट्रीय कंपन्यांची कार्यालयं हिंजवडीत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून आयटी पार्कला घरघर लागली आहे. ऑफिसला ये-जा करताना करावा लागणारा वाहतूक कोंडीचा सामना आणि पायाभूत सुविधांचा अभाव यांच्यामुळे अनेक कंपन्या हिंजवडीतून इतरत्र स्थलांतरित होत आहेत. हिंजवडीत कार्यालयात पोहोचण्यासाठी अनेक कर्मचाऱयांना दीड ते दोन तासांचा अवधी लागतो. तितकाच वेळ ऑफिसमधून घरी जाण्यासाठी लागतो. त्यामुळे दिवसातील किमान चार तास वाहतूक कोंडीत जातात. यामुळे अनेक कंपन्यांनी हिंजवडीला रामराम केला आहे.