|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » Top News » अहमदनगरमध्ये बससचा अपघात ; 30 डॉक्टर जखमी

अहमदनगरमध्ये बससचा अपघात ; 30 डॉक्टर जखमी 

ऑनलाइन टीम/ अहमदनगर

मुंबईतील ‘टाटा कॅन्सर’ हॉस्पटिल व इतर हॉस्पटिलमधील डॉक्टरांच्या लक्झरी बसला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अहमदनगरमधील केडगाव बायपासजवळ भीषण अपघात झाला. यामध्ये बसचालक जागीच ठार झाला तर अन्य 30 डॉक्टर जखमी झाले आहेत. जखमींना अहमदनगरमधील हॉस्पटिलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पहाटे चार वाजता केडगाव बायपासवर हा अपघात झाला आहे. मुंबईवरुन वेरूळकडे निघालेल्या लक्झरी बसमध्ये एकूण 40 डॉक्टर प्रवास करत होते. औरंगाबादमध्ये होणाऱया मेडिकल कॉन्फरन्ससाठी हे डॉक्टर निघाले होते. केडगाव बायपासजवळ भरधाव वेगात असणारी लक्झरी बस पाठीमागून कंटेनरला धडकली. या भीषण अपघातामध्ये अरध्या लक्झरीचा चक्काचूर झाला. डॉ. पुष्कर इंगळे, अनिल टिबडेवाल, जानी कार्टन हे तीन डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. अन्य डॉक्टर किरकोळ जखमी झाले आहेत.

 

 

 

 

Related posts: