|Saturday, July 20, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

सिंहेत बुध प्रवेश, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. तुमच्या सर्वच कामाला वेग प्राप्त होईल. राजकीय- सामाजिक कार्यात विस्कटलेली घडी नीट करता येईल. संघटना अधिक मजबूत करता येईल. धंदा वाढेल. नवे कंत्राट मिळवता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात उत्साहवर्धक घटना घडेल. नवीन ओळखी होतील. कोर्टाच्या कामात यश मिळेल. केस याच सप्ताहात मिटवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक दिवस यश देणारा ठरू शकतो. परीक्षेत यश मिळेल.


वृषभ

 सिंहेत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. घरातील वादाने मन अस्थिर झाले तरी योग्य निर्णय घेता येईल. मुले, जीवनसाथी यांचा विरोध तुम्हाला होईल. धंद्यात लक्ष द्या. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय बदलू नका. राजकीय- सामाजिक कार्यात तुमचे कार्य सुरू राहील. जवळचे लोक कट करण्याचा प्रयत्न करतील. विद्यार्थीवर्गाने घरच्या लोकांना फसवू नये. अभ्यास करावा.


मिथुन

सिंहेत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला ताण, तणाव होईल. रागाचा पारा वाढेल. राजकीय, सामाजिक कार्याला दिशा मिळेल. वेग येईल. पद मिळेल. धंद्यात फायदा होईल. शेअर्समध्ये चांगली गुंतवणूक करता येईल. नविन परिचय होईल. कला, क्रीडा क्षेत्रात त्याचा फायदा होईल. घर, वाहन, जमीन खरेदी, विक्रीत फायदा होईल. कला, क्रीडा क्षेत्रात पुरस्कार व आर्थिक लाभ मिळेल. कठीण काम करून घ्या.


कर्क

सिंहेत  बुध प्रवेश, सूर्य, नेपच्यून प्रतियुती होत आहे. राजकीय, सामाजिक कार्याचा विस्तार करण्याची संधी मिळेल. तुमचा प्रभाव वाढेल. धंद्यात सुधारणा होईल. नवीन काम मिळेल. थकबाकी वसूल करा. नोकरीतील वाद कमी होईल. संसारात मंगळवार, बुधवारी वाटाघाटीचा प्रश्न चिघळण्याची शक्मयता आहे. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. कल्पनेला चांगली दाद मिळेल. परीक्षेत यश मिळेल. कोर्टाच्या कामात आशादायक परिस्थिती राहील.


सिंह

स्वराशीत  बुध प्रवेश, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. सप्ताहाच्या शेवटी गुप्त कारवायांचा त्रास राजकीय, सामाजिक कार्यात होईल. तुमच्यावर आरोप होईल. धंदा वाढेल. मागील येणे वसूल करा. प्रेमाला चालना मिळेल. कला- क्रीडा क्षेत्रात पुरस्कार व लाभ मिळेल. कोर्टकेस लवकर संपवण्याचा मार्ग शोधा. नवीन  ओळख फायदेशीर ठरेल. संसारात सुखद समाचार मिळेल.


कन्या

 सिंहेत बुध प्रवेश, चंद्र शुक्र त्रिकोण योग होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात कशा पद्धतीने तुम्हाला त्रास देता येईल याचा विचार होऊ शकतो. तुमच्या प्रति÷sला धक्का देण्याचा प्रयत्न होईल. धंद्यात अडचणी येतील. संयमाने वागा. अरेरावी करू नका. योग्य सल्ल्याने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करता येईल. कला- क्रीडा क्षेत्रात संधी  मिळेल. परंतु कष्ट घ्या. कोर्टकेसमध्ये अडचणी येतील.


तुळ

सिंह राशीत बुधाचे राश्यांतर, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. तुमच्या सर्वच कार्याला आता वेग येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवे वळण मिळेल. वरि÷ांना तुमच्या कार्याचे कौतुक वाटेल. पदाधिकार दिला जाईल. व्यवसायात जम बसण्यास सुरुवात होईल. मोठे कंत्राट मिळेल. विवाहासाठी स्थळे  येतील. संतती प्राप्तीचा प्रयत्न करा. सप्ताहाच्या सुरुवातीला दुखापत संभवते. वाहन जपून चालवा. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. परीक्षेत यश मिळेल.


वृश्चिक

सिंहेत बुधाचे राश्यांतर, चंद, मंगळ प्रतियुती होत आहे. आत्मविश्वासाने राजकीय, सामाजिक कार्यात निर्णय घेता येईल. जनतेच्या सुखाकडे, योजनेकडे तुमचे दुर्लक्ष होऊ शकते. धंद्यात कष्ट घ्या. स्वत:च्या खाण्याची काळजी घ्या. घरात किरकोळ अडचणी येतील. वाटाघाटीत वाद संभवतो. कला, क्रीडा क्षेत्रात जिद्द ठेवा. कोर्टाच्या कामात फसगत संभवते. पैसा खर्च होईल. परीक्षेसाठी चौफेर तयारी करा.


धनु

साडेसातीचे दुसरे पर्व सुरू आहे. सिंहेत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. प्रकृतीची काळजी घ्या. मनावर  ताण येईल. जवळच्या व्यक्तींचा वेगळाच अनुभव येईल. राजकीय, सामाजिक कार्यात धावपळ करण्याची वेळ येईल. प्रति÷ा वाढेल. लोकप्रियता मिळेल. नवीन ओळख होईल. कला, क्रीडा क्षेत्रात कष्टानेच यश व प्रसिद्धी मिळेल. कोर्टाच्या कामात अडचणी येतील. धंद्यात खर्च होईल. परीक्षेसाठी आळस करू नका.


 मकर

वक्री शनि या आठवडय़ात मार्गी होत आहे. बुधाचे राश्यांतर होत आहे. मंगळवार, बुधवार मनाचा गोंधळ राहील. कटकटी, वाद उदासपणा थोडी मनाची चिडचिड होईल. ठरवलेली गोष्ट मनाप्रमाणे होणार नाही. कामात अडचणी येतील. परंतु गुरुवार, शुक्रवार उत्साह वाढविणाऱया घटना घडणार आहेत. एखादा व्यवहार मार्गी लावू शकाल. शेतीच्या कामात दुर्लक्ष करू नका. विद्यार्थी वर्गाला यंदा प्रगतीचा मार्ग मोकळा आहे.


कुंभ

बुधाचा सिंह राशीत प्रवेश. व्यवसायात उत्साहाचे वातावरण निर्माण करणारे असणार आहे. शेअर्स उलाढालीत फायदा संभवतो. लवकरच 40  हजारपर्यंत जाण्याची शक्मयता आहे. शेतकरी वर्गाने कर्ज लवकर फेडण्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करणे गरजेचे आहे. गुरुवार, शुक्रवार चहाच्या  पेल्यातील वादळे घरातील व्यक्तींबरोबर संभवतात. कला क्रीडा क्षेत्रात नावलौकिक वाढेल. नोकरीत नवीन संधी  मिळण्याची शक्मयता आहे. वैद्यकीय क्षेत्रात प्रगती संभवते.


मीन

बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश करीत आहे. आतापर्यंतचा काळ थोडा कष्टाचा असला तरी थोडा संयम अजून ठेवावा लागेल. प्रत्येक व्यवहारात शांतपणे निर्णय घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शनासाठी आहे. वाईट काळात जपून पाऊले टाकण्याची असतात. मात्र चांगला काळ आळसात घालवायचा नसतो. मोठे मोठे उद्योगपती चांगल्या काळात मोठी झेप घेतात व मोठे होतात. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आपले समाजकार्य सुरूच ठेवा. पुढे मोठी  संधी मिळेल.